भाजपाच आमचा प्रमुख विरोधक : विजय शिवतारे

By Admin | Updated: February 3, 2017 04:04 IST2017-02-03T04:04:04+5:302017-02-03T04:04:04+5:30

प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचेष असे भाजपांचे धोरण आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप्ाांच आमचा

BJP is our main opponent: Vijay Shivtare | भाजपाच आमचा प्रमुख विरोधक : विजय शिवतारे

भाजपाच आमचा प्रमुख विरोधक : विजय शिवतारे

बारामती : प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचेष असे भाजपांचे धोरण आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप्ाांच आमचा
क्रमांक एकचा विरोधक आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना सर्व ताकतीने लढणार आहे, असे
स्पष्टीकरण शिवसेना नेते तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
यांनी केले.
बारामतीत शिवसेना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिवतारे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भाजपात गुंडांना प्रवेश दिला
जात आहे. स्थानिक पक्ष म्हणून आम्ही कोणाशीही युती न करता लढत आहे. प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचे धोरण भाजपाचे आहे. त्यामुळे भाजपाच आमचा या निवडणुकांमध्ये मुख्य
विरोधक असेल.’’
बारामतीच्या नेत्यांकडे अनेक वर्षांपासून सत्ता होती; परंतु ४० ते ४२ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सोडवता आला नाही.
नीरा खोऱ्याचे पाणी वाया जात असताना जलसंपदा खाते, उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानादेखील अजित पवारांनी काही केले नाही, अशी टीका त्यांनी केली. बेबी कालव्याचे ४० कोटी रुपये हडप केल्याने अतिरिक्त पाणी मागील १५ वर्षे सत्ता असताना मिळविता आली नाही. मात्र, दीड वर्षात दोन्ही उपसा योजनांतून जादा आवर्तने देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे श्रेय घेऊच नये. भाजपाचा तर दुरान्वये याच्याशी संबंध नाही, असा टोला
त्यांनी मारला.
शिवतारे यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत असताना भाजपला अधिक लक्ष्य केले. बारामतीतील स्थानिक पवारविरोधक सत्तेची ऊब मिळू लागल्यावर भाजपामध्ये गेले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी संपत चाललेले पक्ष आहेत. त्यामुळे भाजपाला अधिक आमचा विरोध असेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीला घाई कशाची..?
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सतत सांगतात. इसाप नीतीच्या कथेप्रमाणे राष्ट्रवादीचे चालले आहे.
कावळ्याच्या तोंडातील घास मिळविण्यासाठी कोल्हा ज्या पद्धतीने शक्कल लढवतो तसे राष्ट्रवादीचे आहे. विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्याबरोबर भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणाच घातक ठरली, असे खळबळजनक विधान शिवतारे यांनी केले. परंतु, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आपण फारसे बोलणे उचित नाही, असा टोलादेखील त्यांनी मारला.

Web Title: BJP is our main opponent: Vijay Shivtare