शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune: संचारबंदीला भाजपचा विरोध, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 12:03 IST

संचारबंदीचा आदेश पाळणार नसल्याचे केले आंदोलनातून जाहीर

ठळक मुद्देसंचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यास भाजपचा विरोध

जमावबंदी लागण्याच्या पहिल्याच दिवशी पुणे भाजप कडुन आंदोलन करण्यात येत आहे. संचार बंदी पीएमपीएमएल बंद करण्याच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. संचारबंदीचा आदेश आम्ही पाळणार नसल्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळिक यांनी यावेळी जाहीर केले.

खासदार गिरिश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळिक हे आंदोलन करत आहेत. पीएमपीएमएल च्या स्वारगेट जवळील ॲाफिस बाहेर हे आंदोलन होत आहे. मुळात या दोघांच्याच उपस्थितीमध्ये हे आंदोलन होणं अपेक्षित होतं. मात्र इतर कार्यकर्त्यांनी देखील येथे हजेरी लावली आहे.

आंदोलनाविषयी आपली भुमिका स्पष्ट करताना मुळीक म्हणाले “ सरकारने हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. पीएमपीएमएल वर अनेक सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत. या बसेस बंद करण्याचा निर्णय योग्य नव्हता. तरी देखील हा निर्णय घेतला आहे. कारण नसताना संचारबंदी लावली आहे. या अर्धवट लॅाकडाउन चा परिणाम खुप मोठा होणार आहे. सरकारने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना पॅकेज दिलं पाहीजे. त्यामुळे आम्ही संचारबंदीचा आदेश मोडणार आहोत.”

शहरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते पीएमपीएमएल बस स्टॅापवर आंदोलन करतील असे जाहीर करत खासदार गिरीश बापट म्हणाले “ लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हांला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यास आमचा विरोध आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाjagdish mulikजगदीश मुळीकgirish bapatगिरीष बापटMLAआमदार