शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भाजपाचेही काँग्रेससारखेच (ला)क्षणिक उपोषण; पुण्याचा आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:36 IST

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या.

पुणे: काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या देशव्यापी उपोषणाचा फज्जा उडाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भाजपाकडून करण्यात आलेलेही उपोषणही 'इन्स्टंट'च ठरले. भाजपाच्या पुण्यातील बाळा भेगडे व भीमराव तापकीर या दोन आमदारांनी सँडविच आणि मिठाईवर आडवा हात मारल्याचे व्हीडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.

काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर उपोषणासाठी भाजपाचे नेते जमले होते. यामध्ये बाळा भेगडे व भीमराव तापकीर यांचाही समावेश होता. सुरूवातीचा काहीवेळ उपोषणस्थळी हजेरी लावल्यानंतर हे दोघेही जलयुक्त शिवार व खरीप नियोजनाच्या सरकारी बैठकीसाठी गेले. त्याठिकाणी बैठकीच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे खाण्यासाठी सँडविच, वेफर्स आणि मिठाई टेबलावर ठेवण्यात आली. तेव्हा मात्र बाळा भेगडे आणि भीमराव तपकीर यांना उपोषणाचा विसर पडला आणि त्यांनी सँडविच, वेफर्स व मिठाईवर ताव मारायाल सुरुवात केली. काहीवेळातच याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर याबद्दल विचारले असता या दोन्ही आमदारांनी आम्ही सकाळपासून उपाशी असल्याचे कारण सांगितले. मात्र, या प्रकारामुळे पुणे भाजपावर चांगलीच नामुष्कीची वेळ ओढावली आहे.यापूर्वी अॅट्रॉसिटीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून एक दिवसाचे उपोषण करण्यात आलं होतं. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपाचे नेते कामाला लागले होते. यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळा. उपोषणाला येण्याआधी काही खात असाल, तर त्यावेळी फोटो काढू नका, अशा सूचना भाजपाच्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस