जलकेंद्रास निधी न दिल्यास भाजपा नेत्यांना ‘नो एंट्री’

By Admin | Updated: June 23, 2014 22:50 IST2014-06-23T22:50:50+5:302014-06-23T22:50:50+5:30

महापालिकेकडून पर्वती जलकेंद्रात उभारण्यात येणा:या 5क्क् एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण प्रकल्पास निधी देण्यास भाजपा सरकारकडून नकार देण्यात आला आहे.

BJP leaders do not get 'no entry' | जलकेंद्रास निधी न दिल्यास भाजपा नेत्यांना ‘नो एंट्री’

जलकेंद्रास निधी न दिल्यास भाजपा नेत्यांना ‘नो एंट्री’

>पुणो : महापालिकेकडून पर्वती जलकेंद्रात उभारण्यात येणा:या 5क्क् एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण प्रकल्पास निधी देण्यास भाजपा सरकारकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पास निधी न मिळाल्यास भाजपा नेत्यांना पुणो शहरात येऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे पालिकेतील सभागृहनेते सुभाष जगताप यांनी दिला आहे. 
पालिका प्रशासाने निधी मिळावा, यासाठी केंद्र शासनास विनंती करावी, अशा सूचनाही जगताप यांनी या वेळी पालिका आयुक्त विकास देशमुख यांना दिल्या. मात्र, जगताप यांच्या वक्तव्याने भाजपा-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये वादावादी झाली.
शहरातील भविष्यातील वाढीव पाण्याची  मागणी पूर्ण करण्यासाठी पर्वती येथे 5क्क् एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यासाठी केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत सुमारे 198 कोटी रुपयांचा आराखडा केंद्रास पाठविण्यात आला. त्यानुसार, 171 कोटी रुपयांच्या आरखडय़ास  ऑक्टोबर 2क्13 मध्ये केंद्राने मान्यता दिली. तसेच, नगरविकास विभागाने जानेवारी 2क्14 मध्ये या प्रकल्पासाठी निधी देण्याच्या सूचना वित्त विभागास दिल्या. मात्र, लोकसभेची आचारसंहिता असल्याने हा निधी पालिकेस मिळाला नाही. दरम्यानच्या कालावधीत केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपा सरकारने या प्रकल्पास निधी देण्यास नकार दिला आहे. तसेच, प्रकल्प नव्याने पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचे पडसाद आज मुख्यसभेत उमटले. 
केंद्रात सत्ताबदल होताच प्रकल्पास निधी नाकारण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे,  नगरसेवक आबा बागूल  यांनी केला. तसेच, हा प्रकल्प रद्द करू नये, अशी मागणी विशाल तांबे यांनी केली. त्यामुळे सभागृहात कॉंग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये वादावादी सुरू झाली. 
या प्रकरणास राजकीय वळण देऊ नये. या प्रकल्पास निधी देण्याबाबत वरिष्ठांकडे मागणी केली असल्याचे गटनेते गणोश बिडकर यांनी सांगितले.  महापालिकेच्या वतीने केंद्रास पत्र पाठवून शहराची वस्तुस्थिती मांडून, तसेच प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे निदर्शनास आणून देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनास पत्र पाठवावे, अशा सूचना सभागृहनेत्यांनी आयुक्त विकास देशमुख यांना दिल्या.  (प्रतिनिधी)

Web Title: BJP leaders do not get 'no entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.