शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नगरसेविका किरण जठारांचे पद रद्द ; आयुक्त सौरभ राव यांची आदेशावर स्वाक्षरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 12:41 IST

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (ए) च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले.

ठळक मुद्देजात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निर्णय

पुणे : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (ए) च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले असून या आदेशावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी केली. जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एक (ए) कळस-धानोरी या प्रभागात अनुसूचित जाती-महिला असे आरक्षण होते. मनपाच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जठार विजयी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. हे प्रमाणपत्र अवैध ठरल्यावर जठार यांनी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच पडली. मनपा आयुक्त राव यांनी हे प्रकरण राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभागाकडे पाठविले होते.निवडणूक आयोगाकडून आदेश मिळाल्यानंतर राव यांनी जठार यांचे नगरसेवकपद रद्द ठरविण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या प्रकरणाचा दिलीप ओरपे आणि माजी नगरसेवक हुलगेश चलवादी पाठपुरावा करीत होते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ राव