शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 20:59 IST

कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली हाच भाजपचा पराभव

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे.ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांनीही जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशातच तब्बल ५ वेळा कसब्यातून आमदारकी जिंकणारे गिरीश बापट आता आजारपणातही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पुण्याचे खासदार गिरीष बापट यांना आजारपणात प्रचारात उतरवून भाजप  त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतो यांनी केला आहे. 

जगताप म्हणाले, गिरीश बापट उद्यापासून प्रचारात उतरत आहेत. मुळातच त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवल. भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत. मात्र आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे.

विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल

१९६८ नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानल आहे. आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंत चे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला आहे. 

बापटांचा झाला होता पराभव  रम्यान १९९२ च्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव झाला होता. काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूकPoliticsराजकारण