शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:55 IST

महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक आहे

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यातील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात बदनामीचा खटला सुरू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून, राहुल गांधींना स्वतः प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती. या अर्जावर राहुल गांधींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली आणि अर्जावर तीव्र हरकत नोंदवली.

पवार यांनी स्पष्ट केले की, फिर्यादीच्या या अर्जात राहुल गांधींनी न्यायालयात हजर का रहावे याचे कोणतेही कायदेशीर कारण किंवा कायद्याचा ठोस आधार दिलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा अर्ज हा कायद्याच्या दृष्टीने एकतर्फी, आधारहीन व ग्राह्य धरता येण्याजोगा नाही. भाजप व आरएसएसचे कार्यकर्ते आणि फिर्यादी सारख्या हस्तकांकडून देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक आहे, असेही ते म्हणाले.

नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे या गांधी हत्येतील आरोपींचा उल्लेख अर्जात करून त्यांचे अप्रत्यक्ष कौतुक फिर्यादींनी केले आहे. एवढेच नव्हे तर गांधी हत्या झाल्यानंतर गोडसे कुटुंबियांवर समाजाने बहिष्कार टाकला नव्हता, असे नमूद करून समाजाने गांधी हत्या मान्य केली होती, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. या भूमिकेतून फिर्यादी हे गांधी हत्येचे समर्थनच करताना दिसतात, आणि ही बाब खेदजनक व धोकादायक आहे.अॅड. पवार यांनी न्यायालयात मागणी केली की, फिर्यादींनी प्रथम आपला अर्ज कोणत्या कायद्याअंतर्गत दाखल केला आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच राहुल गांधींच्या वतीने या अर्जाला तपशीलवार उत्तर दिले जाईल. या संपूर्ण संदर्भात अॅड. पवार यांनी न्यायालयाला विनंती केली की, कायद्याचा आधार नसलेल्या व लोकशाही विरोधी विचारसरणीला पोषक अशा अर्जाला न्यायालयीन मान्यता देऊ नये. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCourtन्यायालयcongressकाँग्रेसPoliticsराजकारण