शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:33 IST

खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो.

ठळक मुद्देदेशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नावंर जनतेची मते मिळविण्यात यश मिळाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हे मुद्दे वापरुन मते मागता येणार नाही.त्यामुळे भाजपसमोर या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन.. ह्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाने विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचीही संधी ठेवलेली नाही, ही घातक अवस्था आहे. खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो. कारण गेल्या ५ वर्षांच्या काळात आणीबाणीसदृश परिस्थितीच होती. अनेक लेखक, कलाकार दडपणाखाली वावरत होते, प्रसारमाध्यमांवर निर्बंध येत होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले. या वेळी भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणणे नीटपणे न झाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, या वेळी मोदींच्या विरोधात असलेल्या मतदारांना एकत्र करता आले नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दंगलीमुक्त देश असणे आवश्यक आहे. गोरक्षकांकडून होणारे हिंसाचार थांबले पाहिजेत.    सध्या राजकीय पक्षांमध्ये असलेली ‘विचारशून्यता’ हा खूप मोठा धोका वाटतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपच्या वळचणीला जातो. इतरही काही पक्षांतर झाले. या पक्षातून त्या पक्षात जाणे अगदी सहज घडते, इथं कुठेही वैचारिक बैठक आड येत नाही. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस