शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार रोजगार निर्मितीत अपयशी: राष्ट्रवादी काँग्रेस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:10 IST

दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. 

ठळक मुद्देलाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा मुद्रा योजनेत घोटाळा झाला असून कृषीक्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन

पुणे : नोटाबंदीमुळे दोन वर्षात सव्वा कोटी लोकांचा रोजगार गेला असून नवे रोजगार तयार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दोन कोटी रोजगार देऊ अशी घोषणा करुन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली आहे. दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने  जवाब दो-जॉब दो आंदोलन घेण्यात आले. लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्या, मोदी सरकार जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे , माजी आमदार अशोक पवार, बापुसाहेब पठारे, सुरेश घुले, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर, जालिंदर कामठे, विशाल तांबे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे,  युवक अध्यक्ष राकेश कामठे ,युवती अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतातील बेरोजगारीचा दर 52 टक्के झाला असून महाराष्ट्राचा दर 48 टक्के आहे. 2017 मध्ये 15 लाख नोकऱ्या गेल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. राज्यात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढू लागली आहे. पुण्यातही गुन्हेगारीने कळस गाठला आहे. वैफल्यग्रस्त तरुणांना धर्माचा डोस पाजून त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्याकरिता होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या, तर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असती. केवळ पोकळ आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे तुपे यावेळी म्हणाले. मुद्रा योजनेत घोटाळा झाला असून कृषीक्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. मनरेगामध्ये रोजगार नाही, निधीअभावी रोजगार हमीची कामं ठप्प झाली आहेत. जीएसटीमुळे देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मोठ्या उद्योगपतींचा वेताळ पाठंगुळी घेऊन लघु उद्योजकांच्या शिराची सरकारने शंभर शकले केल्याची टीका करण्यात आली. तरुणाईला धार्मिक मुद्दे नकोत, तर नोकऱ्या पाहिजेत असे मत तरुणांनी यावेळी व्यक्त केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNavalkishor Ramनवलकिशोर राम