शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महापालिकेची ‘तिजोरी’स्वच्छ करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 20:22 IST

क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे आंदोलन : पालिकेसमोर वाजविले बँड

पुणे : क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली. महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरु आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी पालिकेचे पदाधिकारी नातेवाईकांना पुढे करुन पालिकेची तिजोरी स्वच्छ करीत असल्याचे चित्र असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पालिकेत बँड वाजवून आंदोलन करण्यात आले.सर्वसामान्य करदात्या थकबाकीदारांच्या घरापुढे बँड वाजविणाऱ्या पालिकेच्या पुढ्यात बँड वाजवित आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन गेल्या वर्षी घसरुन 13 व्या स्थानी गेले होते. यावर्षी ते 37 व्या स्थानापर्यंत घसरले आहे. या घसरगुंडीबाबत सत्ताधारी देत असलेल्या सबबी लंगड्या आणि फसव्या आहेत. ही पुणेकरांची फसवणूक आहे. पुणे स्मार्ट करु असे म्हणत म्हणत शहराची वाट लावण्याचे काम सुरु आहे. याला शहर आणि राज्यातील सत्ता, भाजपा-सेना युती कारणीभूत असल्याचा आरोप शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला. कर भरायला एखादा नागरिक चुकला तर त्याच्या घरापुढे बँड वाजविण्यात येतो. मग सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांची चालवलेली फसवणूक म्हणून राष्ट्रवादीने बँड वाजवित आंदोलन केल्याचे तुपे म्हणाले. शेकडो कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या मोबाईल कंपन्यांना कामाची आणि खोदाईची परवानगी कशी दिली जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर च्या वतीने आज शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या खालावलेल्या कारभारावर व दर्जाहीन तेवर आज महानगरपालिकेच्या दारात बँड वाजून आंदोलन करण्यात आलंया आंदोलनात रवींद्र माळवदकर, राकेश कामठे, विजय डाखले, संतोष नांगरे, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब बोडके, प्रदीप देशमुख, शिल्पा भोसले, मनोज पाचपुते, गणेश नलावडे, स्वप्निल दुधाने, नितीन कदम, विनायक हनमघर, फहीम शेख,  शांतीलाल मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा