भाजपाला राहुल यांची भीती; म्हणूनच करतात लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST2021-07-21T04:09:05+5:302021-07-21T04:09:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपाला राहुल गांधी यांची भीती वाटते, म्हणूनच ते कायम त्यांना लक्ष्य करत असल्याची टीका ...

BJP fears Rahul; So do the targets | भाजपाला राहुल यांची भीती; म्हणूनच करतात लक्ष्य

भाजपाला राहुल यांची भीती; म्हणूनच करतात लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपाला राहुल गांधी यांची भीती वाटते, म्हणूनच ते कायम त्यांना लक्ष्य करत असल्याची टीका काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली. राज्यात महिला काँग्रेस सक्षम असून काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल असा दावा त्यांनी केला.

सव्वालाखे मंगळवारी (दि. २९) पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संगीता धोंडे, सरचिटणीस संगीता तिवारी, शहराध्यक्ष सोनाली मारणे या वेळी उपस्थित होत्या.

सव्वालाखे म्हणाल्या, “राहुल गांधी सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. त्यामुळेच ते असभ्य भाषेत प्रत्युत्तर करत नाहीत. पक्षाचे अध्यक्ष होण्याची पूर्ण क्षमता त्यांच्यात आहे. प्रियांका गांधी याही अध्यक्ष होऊ शकतात. पण आम्ही त्याचा विचार करत नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत घेतील तो निर्णय मान्य करून पुढे जाण्याची आमची भूमिका आहे.”

महिला काँग्रेस क्षीण झाल्याचे ठाम नाकारत सव्वालाखे यांनी सक्षमतेचा दावा केला. देशात व राज्यातह महिला काँग्रेस पूर्ण क्षमतेने काम करते आहे. घरातील कामे, कौटुंबिक समस्यांवर मात करत महिला पुढे येत आहेत. केंद्र सरकार, त्यांचे धोरण, वाढती महागाई यावर काम करू इच्छिणाऱ्या कोणत्याही महिलेसाठी काँग्रेसचे दरवाजे सदैव खुले असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारी समित्या, महामंडळांवर कॉंग्रेस महिला कार्यकर्त्यांना निश्चित स्थान मिळेल.

Web Title: BJP fears Rahul; So do the targets