शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:20 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही

पुणे : मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतात, तेव्हा त्यांना चांगले वाटते. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे-उद्धवसेना एकत्रित मोर्चा काढतात, ते त्यांना रुचत नाही. हा भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका उद्धवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धवसेना राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत एकत्रित मोर्चा काढत आहेत. आधी मनसेने ६ जुलै ही तारीख जाहीर केली. त्यानंतर उद्धवसेनेने ७ जुलै, त्यानंतर मनसेने पुन्हा तारीख बदलून ५ जुलै केली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मध्यस्थीने एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यावर पुण्यामध्ये पत्रकारांबरोबर बोलताना अंधारे यांनी यावर भाष्य केले. 

अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्र आणि मराठी माणूस हेच शिवसेनेचे ध्येय आहे. त्यामुळे त्याबाबतीत आमच्याकडून कधीही, कसलीही तडजोड होणार नाही. हिंदी भाषेची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही सांगतात. मात्र, विद्यार्थ्यांना हिंदी वगळून जी दुसरी भाषा शिकायची असेल, तिचे किमान २० विद्यार्थी हवेत, त्या भाषेचे शिक्षक हवेत, ते नसतील तर ऑनलाइन शिकावे लागेल, ही आडवाटेने केलेली सक्तीच आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.मराठीबद्दल राज्य सरकारला प्रेम असते, तर त्यांनी दोन महिने वाट पाहिली नसती. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे यांना ते शक्य होणार नाही, याचे कारण त्यांच्यात तेवढे धाडसच नाही, असे अंधारे म्हणाल्या. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या, या भाषेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSushma Andhareसुषमा अंधारेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी