लष्कराच्या जवानाचा पोलिसाला चावा; वॉकीटॉकी हिसकावत फाडले लूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:44 AM2018-03-22T03:44:21+5:302018-03-22T03:44:21+5:30

वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालत लष्कराच्या जवानाने पोलीस हवालदाराच्या डाव्या पायाला चावा घेतला. पोलिसाच्या खांद्याला लावलेली वॉकीटॉकी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत या जवानाने वर्दीचे लूपही तोडले.

Bite the army's police force; Tear off walkie talkie | लष्कराच्या जवानाचा पोलिसाला चावा; वॉकीटॉकी हिसकावत फाडले लूप

लष्कराच्या जवानाचा पोलिसाला चावा; वॉकीटॉकी हिसकावत फाडले लूप

Next

खडकी : वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालत लष्कराच्या जवानाने पोलीस हवालदाराच्या डाव्या पायाला चावा घेतला. पोलिसाच्या खांद्याला लावलेली वॉकीटॉकी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत या जवानाने वर्दीचे लूपही तोडले. खडकी रेल्वे स्थानकालगतच्या औंध रस्त्यावर साई मंदिराजवळ मंगळवारी (दि. २०) रात्री पावणेआठला हा प्रकार घडला.
श्रीनिवासन (रा. क्यूएमटीआय, खडकी) या लष्करी जवानावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेले हवालदार आर. एन. भांबुरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
खडकी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेन स्नॅचिंग प्रतिबंधात्मक कारवाईसाठी खडकीत साई मंदिराजवळ वाहनांची तपासणी करण्यात येत होती. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या सूचनेनुसार ही तपासणी सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक छाया कांबळे, हवालदार एन. गायकवाड आणि आर. एन. भांबुरे आदी इतर सहकाºयांसह वाहन तपासत होते. मंगळवारी पावणेआठ वाजताच्या सुमारास लष्करी जवान श्रीनिवासन व हवालदार गायकवाड यांच्यात वाद झाला होता.

Web Title: Bite the army's police force; Tear off walkie talkie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.