तलवारीने केक कापून वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:15 IST2021-09-15T04:15:27+5:302021-09-15T04:15:27+5:30

युवकावर गुन्हा : बारामती येथील तांदूळवाडी भागातील घटना बारामती : शहरातील तांदूळवाडी भागातील युवकावर तलवारीने केक कापून वाढदिवस ...

Birthday by cutting a cake with a sword | तलवारीने केक कापून वाढदिवस

तलवारीने केक कापून वाढदिवस

युवकावर गुन्हा : बारामती येथील तांदूळवाडी भागातील घटना

बारामती : शहरातील तांदूळवाडी भागातील युवकावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकावर तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दिली आहे.

पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर कांतीलाल डेरे (वय २३) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी (दि. १३) ही कारवाई केली. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग केले जात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मयूर डेरे याने तलवारीने वाढदिवसाचा केक कापल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक पंचांना घेऊन लागलीच त्याच्या घरी पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने झाडाच्या बुंध्याजवळ एका पिशवीत ठेवलेली तलवार पोलिसांना काढून दिली. त्याच्याकडून २७ इंच पात्याची पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Birthday by cutting a cake with a sword