शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

वाढदिवसाचे केक तलवार, रेम्बो चाकूने कापत फोटो व्हाटस ॲपवर टाकणं पडलं महागात; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:44 IST

रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करत आहेत.

पुणे : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून तो फोटो व्हाटसॲपवर टाकणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने तलवारीसह पकडले.

दत्तात्रय लक्ष्मण धनकवडे (वय ४२, रा. दत्तप्रसाद अपार्टमेंट, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्यावर आळा बसविण्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुन्हे शाखेला दिले आहेत.

दत्तात्रय धनकवडे याने ९ एप्रिल रोजी स्वत:चे वाढदिवसाच्या दिवशी तलवार हातात घेऊन केक कापला असून त्याचा फोटो व्हाटसॲपवर टाकला होता. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना दत्तात्रय धनकवडे हा तलवारीसह घराच्या खालील चौकात उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन धनकवडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार मिळून आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टिपू ऊर्फ सलमान इम्तियाज शेख (वय ३०, रा. न्यू मंगळवार पेठ) याने २५ जुलै रोजी आपल्या वाढदिवशी रेम्बो चाकूने केक कापून ताे फोटो आपल्या व्हाटसॲपवर ठेवला होता. पोलीस अंमलदार इ्म्रान शेख यांना टिपू हा साई हेरीटेज हॉटेलजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पोलीस पथकाने टिपूला पकडून त्याच्याकडून रेम्बो चाकू जप्त केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक