बायोगॅस प्रकल्पाची होणार चौकशी
By Admin | Updated: June 23, 2014 22:39 IST2014-06-23T22:39:06+5:302014-06-23T22:39:06+5:30
प्रकल्पांतील गैरव्यवहाराची चौकशी उपायुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले.

बायोगॅस प्रकल्पाची होणार चौकशी
>पुणो : महापालिकेने कोटय़वधी रुपये खचरून बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. पूर्ण क्षमतेने सुरू नसलेल्या प्रकल्पांतील गैरव्यवहाराची चौकशी उपायुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले.
गेल्या पाच वर्षात महापालिकेने तब्बल 17 ठिकाणी कोटय़वधी रुपये खचरून बायोगॅस प्रकल्प उभारले असून, आणखी 7 प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, एक ते दोन वर्षातच काही प्रकल्प बंद पडले आहेत. उर्वरित बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. मात्र, आतार्पयत प्रकल्पाच्या कार्यवाहीचे ऑडिट करण्यात आलेले नाही. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या शक्यतेने चौकशीसाठी तीन महिन्यांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, चौकशी प्रक्रियेतून गैरव्यवहार उघड होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनातील काही वरिष्ठ अधिका:यांच्या दबावामुळे चौकशी समितीची प्रक्रिया गुंडाळून ठेवण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले. त्यामुळे मुख्यसभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
समिती गुंडाळण्यामागे काय हेतू आहे, असा सवाल भाजपाच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केला. त्यावर जगताप म्हणाले, ‘‘चौकशी समितीचे अध्यक्ष, तत्कालीन उपायुक्त सुधाकर देशमुख यांची बदली झाली. त्यामुळे
चौकशी समितीचे काम रखडलेले आहे. मात्र, देशमुख यांना समितीच्या कामासाठी बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे चौकशी सुरू होईल.’’(प्रतिनिधी)