शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आयटीआयला मिळालेले कोट्यवधी रुपये पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:46 AM

राज्यात अडीचशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) चा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून २००७ ते २०११ या चार वर्षांत तब्बल सव्वा सहाशे कोटी रुपये मिळाले.

- राजानंद मोरे पुणे : राज्यात अडीचशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) चा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून २००७ ते २०११ या चार वर्षांत तब्बल सव्वा सहाशे कोटी रुपये मिळाले. पण या निधीचा पुरेपुर वापर न झाल्याने कोट्यवधी रुपये बँकांमध्ये पडून असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासनाला जाग आली असून ‘आयटीआय’मधील संस्था व्यवस्थापन समिती सोसायट्यांचे (आयएमसीएस) पुनरुज्जीवन करून हा खर्च करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत.शासकीय आयटीआयमधील शैक्षणिक दर्जा सुधारणे तसेच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने२००७-०८ पासून ‘सार्वजनिकखासगी भागीदारी’ (पीपीपी)या संकल्पनेनुसार खासगीउद्योगांना संस्थांशी जोडण्याचा निर्णय घेतला.या योजनेअंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये ‘आयएमसी’ स्थापन करून सोसायटी म्हणून नोंदणी करणे आवश्यक होते. तसेच प्रत्येक संस्थेला २००७-०८, २००८-०९, २००९-१० आणि २०१०-११ या चार वर्षांत टप्प्याटप्याने अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार राज्यातील एकूण ४१७ पैकी २५० शासकीय आयटीआयला हा निधी मिळाला.उद्योगांना सहभागी करून घेत त्यांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रम, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षणपद्धतीत बदल करून आयटीआयचे रूपडे पालटण्याचा हेतू होता. मात्र, बहुतेक संस्थांमधील ‘आयएमसी’ सक्रिय न राहिल्याने निधी खर्चच झाला नाही.हा निधी बँकांमध्ये तसाच पडूनआहे. या निधीचा वापर नझाल्याने संस्थांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. परिणामी हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहिले.सध्या राज्यातील सर्व ‘आयटीआय’चा विस्तार आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने बँकांमध्ये पडून राहिलेले कोट्यवधी रुपये खर्च करण्याबाबत शासनाला जाग आल्याचेदिसते. आराखड्यामध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावरील २५० आयटीआयचाही समावेश केला आहे. त्यानुसार राज्य सरकारने संबंधित २५० आयटीआयमधील ‘आयएमसी’ पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.बहुतेक सर्व ‘आयएमसी’ची पुनर्रचना करण्यात आली आहे. सक्रिय नसलेल्या कंपन्याचे प्रतिनिधी बदलून नवीन कंपन्यांना संधी देण्यातआली आहे. संस्थांचे जुने विकास आराखडे नव्याने तयार करून राज्य सुकाणू समितीकडे मान्यतेसाठी पाठविले जात आहे.हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. या माध्यमातून केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा पुरेपुर वापर करून ‘आयटीआय’सुसज्ज केले जाणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्राचा सहभागही मोठ्या प्रमाणावर करून घेत त्यांच्या गरजेनुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.>पुणे विभागात ३९ ‘आयटीआय’ : पुढील २ वर्षांत नवीन १९८ तुकड्या सुरूपुणे विभागात एकूण ६१ शासकीय आयटीआय असून त्यापैकी ३९ संस्थांची निवड करण्यात आली आहे. संस्थांचे विकास आराखडे तयार झाले असून सुकाणू समितीकडे पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.या संस्थांमध्ये पुढील दोन वर्षांत नवीन १९८ तुकड्या सुरू करण्यात येतील. त्यातून तब्बल चार हजार नवीन प्रवेश क्षमता वाढणार आहे. नवीन समित्या करताना क्रियाशील नसणारे अध्यक्ष, कंपन्यांचे प्रतिनिधी बदलण्यात आले आहेत.त्यामुळे या समित्या सक्षमपणे कार्यरत राहतील, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागाचे प्रभारी सहसंचालक राजेंद्र घुमे यांनी दिली.>‘आयएमसी’ची रचनाप्रत्येक आयटीआयमध्ये संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) स्थापन करून त्यांची सोसायटी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. या सोसायटीचे अध्यक्ष संस्थेच्या परिसरातील कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी असतात. तर संस्थेचे प्राचार्य हे सोसायटीचे सचिव, अन्य चार कंपन्यांचे प्रत्येक एक पदाधिकारी, रोजगार अधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी प्रतिनिधी असे एकूण ११ सदस्य असतात. केंद्राने थेट या समित्यांनाच अडीच कोटी निधी खर्च करण्याचे अधिकार दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार निर्णय घेणे अपेक्षित आहे.>असे होणार बदल...उद्योगांच्या गरजेनुसार नवीन अभ्यासक्रमकालबाह्य अभ्यासक्रम बंद करणारतुकड्या वाढविणारई-लर्निंग सुविधासंगणक कक्षउत्पन्नप्राप्तीसाठी प्रयत्नअद्ययावत यंत्रसामग्रीविद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देणेशैक्षणिक दर्जा सुधारणेपरिसर सौंदर्यीकरणपायाभूत सुविधांचा विकास

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई