शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

Pune: पुलावरून कोसळून दुचाकी चालक ठार, नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 21:01 IST

पवार हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच बसरापूर गावावर शोककळा पसरली....

खानापूर (पुणे : वीसगाव खोऱ्यातील नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावर बंद पडलेली दुचाकी अचानक चालू होऊन वेगाने चालकासह ओढ्यात कोसळून दुचाकी चालक ठार झाला. अपघातात दुचाकी चालक शांताराम मारुती पवार (रा. बसरापूर, ता. भोर वय ६२) ठार झाले. पवार हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच बसरापूर गावावर शोककळा पसरली.

या संदर्भात भोर पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक शांताराम पवार (रा. बसरापूर ता.भोर,वय ६२) हे वरवडी येथे नातेवाइकाच्या तेरावा विधीसाठी दुचाकीवरून (दुचाकी क्र.एम.एच.१२ पी.डी.१७२४) वरवडी येथे गेले होते. तेराव्याचा विधी उरकून ते एका सहप्रवाशाबरोबर भोरकडे निघाले असता वरवडी नेरे दरम्यानच्या ओढ्यावरील पुलावर दुचाकी बंद पडल्याने सहप्रवासी तानाजी बाबुराव कोंढाळकर(रा.अंबाडे वय ५५) हे खाली उतरले. त्यानंतर दुचाकी चालक पवार यांनी गाडीची तपासणी करून दुचाकी चालू करण्यासाठी बटण दाबले असता अचानक दुचाकीने वेग घेतला व पवार यांच्यासह दुचाकी ओढ्याच्या पात्रात कोसळली. सहप्रवाशी कोंढाळकर हे गाडीवरून उतरले होते त्यामुळे ते बचावले.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी