शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | बारामती-इंदापूर मार्गावर खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:55 IST

पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू...

बारामती (पुणे) :बारामती-इंदापूर मार्गावर लिमटेक येथे पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रात्री घडली. महेश तुळशीराम ठोंबरे (वय २८ रा. खताळपट्टा, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

शनिवारी महेश रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या पल्सर दुचाकीवरून बारामती येथून खताळपट्टा येथील घरी निघाला होता. पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने लिमटेक येथे रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आहेत. त्या खड्ड्यात पडून महेशचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने दुचाकी खड्ड्यात पडली. त्यात महेश याला तत्काळ कोणाची मदत मिळू शकली नाही. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर महेश याच्या दुचाकी नंबरवरून पत्ता शोधत पोलिसांनी महेशच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास महेश त्याला रुई ग्रामीण रुग्णालय येथे आणले; मात्र मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी स्पष्ट केले. शव विच्छेदनानंतर त्याच्यावर दुस-या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक लहान मुलगा, मुलगी, पत्नी आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

या परिसरात पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने महेशचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी केला आहे. बॅरिगेट अथवा सूचना फलक लावले नसल्याने त्यामुळे जाण्या येण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीIndapurइंदापूरAccidentअपघात