शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:30 IST

सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड, आदर्श मित्र मंडळ आणि पुणे पोलीस यांचा पुढाकारतत्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा : उदय जगताप

पुणे : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या जीवनावश्यक सुविधादेखील उपलब्ध नाहीत. सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील इतरांनीदेखील अशा दुर्गम भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड, आदर्श मित्र मंडळ आणि पुणे पोलीस यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिका हस्तांतर समारंभाचे आयोजन स्वारगेट येथे करण्यात आले होते. या वेळी रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य देवधर, रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, आदर्श मित्र मंडळचे कार्यकर्ते, परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, अ‍ॅड. प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, दुचाकी रुग्णवाहिका बनविणारे सुदर्शन डोईफोडे, नितीन करंदीकर, उदय कुलकर्णी, महेश झुरळे उपस्थित होते. 

दुर्लक्षित भाग रवींद्र कदम म्हणाले, ‘गडचिरोली जिल्ह्यात अनेक संसाधने उपलब्ध असतानादेखील प्रस्थापित व्यवस्थेचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा भाग अजूनही दुर्लक्षित आहे. तेथील स्थानिक जनता वेगवेगळ्या दुष्टचक्रात अडकलेली आहे. त्यांच्या या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ 

गडचिरोलीमधील एका गावात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका वडिलांनी स्वत:च्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालत घरी आणला. ही घटना लक्षात घेऊन अशा घटना भविष्यात होऊ नयेत आणि तत्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा पुण्यातून उपलब्ध करून दिली आहे.    - उदय जगताप

टॅग्स :Puneपुणे