पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही गुटख्याची 'मोठी उलाढाल'; 'एफडीए' कडून दीड कोटींचा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 12:15 PM2020-10-26T12:15:16+5:302020-10-26T12:24:59+5:30

एफडीएने एप्रिल ते दहा ऑक्टोबर २०२० या कालावधीत पुणे जिल्ह्यातून १ कोटी ४० लाख २१ हजार ४७३ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे..

'Big' turnover of Gutkha in Pune district; Seized of Rs 1.5 crore in six months | पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही गुटख्याची 'मोठी उलाढाल'; 'एफडीए' कडून दीड कोटींचा जप्त 

पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही गुटख्याची 'मोठी उलाढाल'; 'एफडीए' कडून दीड कोटींचा जप्त 

Next
ठळक मुद्देगुटखा तस्करांनी आपली उत्पादन, वाहतूक आणि साठवणुकीची स्वतंत्र व्यवस्था उभारल्याचे स्पष्ट

विशाल शिर्के -
पुणे : गुटखा बंदी आणि टाळेबंदी (लॉकडाऊन) अशा कोणत्याही प्रकारे गुटखा, पान मसाला सुगंधित तंबाखूचा काळाबाजार रोखणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. केवळ पुणे जिल्ह्यातच गेल्या सहा महिन्यात १ कोटी ४० लाख रुपयांहून अधिक गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

विविध स्वयंसेवी संघटना, कॅन्सरवर काम करणाऱ्या नामांकित आरोग्य संस्थांच्या हवाल्याने राज्यात २०१२ साली अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुटखा, पान मसाला बंदी लागू करण्यात आली. त्या नुसार राज्यात गुटखा निर्मिती, वाहतुक, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र त्या नंतरही गुटखा सर्रास उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. नुकतेच पोलिसांनाही गुटखा, पान मसाल्यावर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. या पूर्वी एफडीएच्या साहाय्याने पोलीस कारवाई करत. असे असूनही कारवाईमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त होत असल्याचे एफडीएच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक ठप्प पडली होती. अगदी जून महिन्या पर्यंत वाहतुकीवर बरेच निर्बंध होते. असे असतानाही गुटखा, पान मसाला सहज उपलब्ध होत आहे. एफडीएने एप्रिल ते दहा ऑक्टोबर २०२० या कालावधीत पुणे जिल्ह्यातून १ कोटी ४० लाख २१ हजार ४७३ कोटी रुपयांचा गुटखा ५१ प्रकरणांमध्ये जप्त केला आहे. म्हणजेच प्रत्येक प्रकरणात पावणेतीन लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तर, २०१५-१६ पासूनची आकडेवारी पाहिल्यास ६१६ प्रकरणांत १७ कोटी २० लाख ५५ हजार २९६ रुपयांचा गुटखा, पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. म्हणजेच प्रत्येक प्रकरणात सरासरी २.७९ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याचाच अर्थ बंदी असो की टाळेबंदी गुटखा तस्करांनी आपली उत्पादन, वाहतूक आणि साठवणुकीची स्वतंत्र व्यवस्था उभारल्याचे स्पष्ट होत आहे.

----


गेल्या पाच वर्षातील जिल्ह्यातील गुटखा-पान मसाला कारवाई (रुपयात)

साल                              जप्त माल                    प्रकरणे

२०१५-१६                         ९९,९४,२६६                 १७७

२०१६-१७                          ७८,३६,९९९                ४१

२९१७-१८                          ६,९०,५४,२३९            १३६

२०१८-१९                         ३,८९,९२,९५७             १४९

२०१९-२०                         ३,२१,५५,३६२              ६२

एप्रिल- १० ऑक्टो.20  -  १,४०,२१,४७३              ५१

Web Title: 'Big' turnover of Gutkha in Pune district; Seized of Rs 1.5 crore in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.