पीएम केअर फंडात मोठा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:36+5:302021-05-15T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना निर्मूलनार्थ स्थापन केलेल्या पीएम केअर फंडातून बोगस व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आली. या निधीत ...

पीएम केअर फंडात मोठा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना निर्मूलनार्थ स्थापन केलेल्या पीएम केअर फंडातून बोगस व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आली. या निधीत मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय काँगेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांंनी व्यक्त केला. राज्यात असे व्हेंटिलेटर आले असून त्याच्या कंपन्या गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस भवनात शुक्रवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अभय छाजेड, रमेश अय्यर आदी यावेळी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, केंद्र सरकारने या निधीतून मुंबई व अन्य काही ठिकाणी व्हेंटिलेटर पाठविले. ते नादुरूस्त झाले. त्यांच्या उत्पादक कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी यांचा पत्ता लागत नाही. हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे. माहितीच्या अधिकार कायद्यातंर्गत याची माहिती दिली जात नाही. याची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करत असल्याचे सावंत म्हणाले.