शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल सुरु करण्यास राज्य शासनाचा 'हिरवा कंदील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 21:12 IST

रेल्वे, पोलीस प्रशासन चर्चा करुन घेणार निर्णय..

ठळक मुद्देलोकल सुरु केल्यावर रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढणार

पुणे : मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल सुरु करण्यास राज्य शासनाने तत्वता मान्यता दिली असून त्यासंबंधितच्या मार्गदर्शक सुचना आज जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे विभागात लोकल सुरु करण्याविषयी नोडल अधिकारी म्हणून पोलीस आयुक्तांनी संबंधित घटकांशी समन्वय साधावा, असे त्यात म्हटले आहे.याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा अभ्यास करुन लोकल सुरु करण्याबाबत संबंधित सर्व घटकांशी चर्चा करुन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून लोकल सुरु करण्यास सहमती मिळाली आहे. याबाबत रेल्वेचे विभागीय अधिकाऱ्यांची लोकल सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे. पोलीस आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांशी कोणत्या गाड्या, कधी व किती सुरु करायचा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानुसार कोविड १९ बाबतच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन सुरक्षेच्या विचार करुन लवकरच निर्णय घेतला जाईल. सध्या पुण्यातून पुणे -दानापूर ही एकच विशेष रेल्वेगाड्या चालविली जाते. या गाडीचे आरक्षित तिकीट असल्याशिवाय प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नाही. लोकल सुरु केल्यावर रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढणार आहे. त्यादृष्टीने तिकीट खिडक्या, तेथे सामाजिक अंतर पाळणे, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर, लोकलमधील सामाजिक अंतर पाळण्याविषयी जनजागृती, मास्कचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे.त्यात पुण्यातून लोणावळा दरम्यान लोकल तर पुणे -दौंड, बारामती दरम्यान डेमू लोकल धावत होत्या. त्यापैकी अगोदर कोणत्या व किती लोकल सुरु करायच्या याचा विचार करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेlocalलोकलState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसrailwayरेल्वे