शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी: हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:08 IST

मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला सुनावत लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.

Pune Lok Sabha By Election ( Marathi News ) :पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. कारण ही पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पुण्यात पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला काही महिने उलटून गेल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित न झाल्याने शहरातील नागरिक सुघोष जोशी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक झालेली नसल्याने या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न लोकसभेत कोण उपस्थित करणार? असा सवाल विचारत पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली.

यावेळी निवडणूक आयोगाने बाजू मांडताना म्हटलं होतं की, आम्ही २०२४च्या निवडणूक कामात व्यस्त आहोत. तसेच देशात अन्य ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. या कारणास्तव पुण्याची पोटनिवडणूक घेणे शक्य नाही. आता निवडणूक घेतली तर काही महिन्यांतच कार्यकाळ संपेल, असा प्रतिवाद आयोगाकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावत लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने पोटनिवडणुकीच्या आदेशाला स्थगिती दिल्याने पुणे शहरात पोटनिवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीश बापटBJPभाजपाlok sabhaलोकसभा