शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पोलिसांच्या बदल्या होणार अधिक पारदर्शी; अंतर्गत बदल्यांसाठी 'जीटीपीएमएस' अ‍ॅप प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 22:26 IST

शहर पोलीस दलातील अंतर्गत बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो.

पुणे : शहर पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुसूत्रता यावी, यासाठी पुणे पोलीस दलात आता सर्वसाधारण बदली पोलीस व्यवस्थापन प्रणाली (जीटीपीएमएस)या अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. यंदा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करणार आहे. या प्रणालीत प्रत्येक कर्मचार्‍यांची पदनिहाय व कामानिहाय नोंदी होणार आहे. तसेच परिमंडळातील कोणत्या पोलीस ठाण्यात सहायक फौजदार, हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांची संख्या किती आहे, हे देखील बदलीच्यावेळी दिसणार आहे. 

शहर पोलीस दलातील अंतर्गत बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. गेल्या वर्षी सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयात बदली बदलून मिळावी, यासाठी विनंती अर्ज करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची मोठी रांग लागली होती. या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या पथकाने एका कंपनीमार्फत हे अ‍ॅप विकसित केले आहे.

नियमित वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्यांची माहिती परिमंडळाकडून भरुन घेण्यात आली आहे. पात्र असलेल्या पोलिसांनी यापूर्वी कोणत्या पोलीस ठाण्यात काम केले आहे. त्यांचे पद, त्यांच्या कामाच्या स्वरुपासह वैयक्तिक माहिती या अ‍ॅपमध्ये भरण्यात आली आहे.

या वर्षी कार्यकाळ पूर्ण झालेल्या १३०० पोलिसांच्या नियमित बदल्या होणार आहेत. तर साडेसातशे पोलिसांनी विनंती बदल्यासाठी अर्ज केला आहे.  

मनुष्यबळाचे होणार नियोजनशहरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या मंजूरीच्या वेळी जेवढे मनुष्यबळ होते, तेवढेच अजूनही मनुष्यबळ आहे. त्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. या अ‍ॅपमध्ये भरण्यात आलेल्या माहितीवरुन पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाची आवश्यकता समोर येणार आहे. त्यानुसार मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदलीcommissionerआयुक्त