शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

मोठी बातमी :सैन्यदल भरती पेपर फोडण्यात अधिकारी, कर्मचार्‍यांचा हात; पुणे पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:38 IST

६० परीक्षार्थींना देणार होते प्रश्नपत्रिका

पुणे : भारतातील ४० केंद्रांवर होणार्‍या सैन्य दलातील शिपाई भरती परिक्षेचा पेपर फोडण्यामध्ये लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी, भरतीसाठी क्लास चालविणारे चालक तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून हस्त केलेली प्रश्न पत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी १०० टक्के जुळत असल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिमाभ गुप्ता यांनी दिली.

किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. माळेगाव, बारामती), माधव शेषा्राव गित्ते (वय ३८, रा. सॅपर्स विहार कॉलनी), तसेच गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. बी. ई. जी. सेंटर, दिघी) उदय दत्तु आवटी (वय २३, रा. बी. ई.जी. खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किशोर गिरी हा सैन्य भरती संबंधी क्लास चालवितो़ तर, माधव गित्ते हा जानेवारी अखेर लष्करातून हवालदार पदावरुन निवृत्त झाला आहे. गोपाळ कोळी हा ट्रेनिंग बटालियन २ मध्ये कवायत प्रशिक्षक आहे. उदय आवटी हा रेजिमेंटल पोलीस म्हणून लष्करात कार्यरत आहे. याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी ट्रेनिंग बटालियन २ येथे व भारतातील ४० केंद्रांवर रिलेशन आर्मी शिपाई भरतीची लेखी परिक्षा होती. त्यात देशभरात लष्करातील नातेवाईकांचे ३० हजार परीक्षार्थी परिक्षा देणार होते. या परिक्षेची प्रश्न पत्रिका काही जण व्हॉटसअ‍ॅप वरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली होती. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख व खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी बारामती येथे छापा मारुन किशोर गिरी व माधव गित्ते यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात माधव गित्ते याच्याकडे फोडलेली प्रश्नपत्रिका परिक्षेच्या आदल्या रात्री आली होती. त्याने १४ परीक्षार्थींना देण्यासाठी विश्रांतवाडी येथील समृद्धी हॉटेल येथे एकत्र केले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार योगेश ऊर्फ गोट्या शंकर गोसावी (रा. माळेगाव, बारामती), कुमार परदेशी (रा. फलटण, जि़ सातारा) आणि भरत (रा. जळगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचवेळी आणखी एक टोळी पेपर फोडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अली अख्तरखान (वय ४७, रा. गणेशनगर, बोपखेल), आजाद लालमहंमद खान (वय ३७, रा. गणेशनगर, बोपखेल, दोघे मुळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय ३७, रा. आशाधन सोसायटी, दिघी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे प्रत्येक परिक्षार्थीकडून १ लाख रुपये घेऊन पेपर आणून देणार असल्याची माहिती दिली. त्यांना दिघी येथील साईबाबा मंदिर येथे सापळा रचून पकडण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील, दीपक माने, शशिकांत शिंदे, सहायक फौजदार महेंद्र पवार, हवालदार सचिन ढवळे, गणेश साळुंखे, नाईक, प्रविण भालचिम, सुरेंद्र साबळे, हवालदार शितल शिंदे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, उपनिरीखक सोमनाथ शेंडगे, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, हवालदार प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, अतुल साठे, प्रफुल्ल चव्हाण, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली.......लष्करातील अधिकार्‍यांचा हात असल्याची शक्यताअत्यंत गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रत्यक्ष पुरावा हा व्हॉटसअ‍ॅपवर आलेले पेपर होते. आरोपींना थोडी जरी शंका आली असती तर ते पुरावा नष्ट करु शकले असते. आरोपी हे लष्करातून निवृत्त झालेले, सध्या कार्यरत असलेले तसेच भरतीचे क्लास चालविणारे आहेत. त्यांच्यापर्यत मुळ प्रश्न पत्रिका कशी आली. यात निश्चितच सध्या कार्यरत असलेल्यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे व याची पाळेमुळे आणखी खोल असल्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यांनी सांगितले.                                                                

वेगवेगळ्या शहरातील परीक्षार्थींशी संपर्कात त्यांनी सुमारे ६० परीक्षार्थीशी संपर्क साधला होता. त्यातील अनेक जण सातारा, जळगाव, नाशिक, मराठवाडा येथील होते. त्यांच्याकडून ते अगोदर १ लाख व भरती झाल्यानंतर एक लाख रुपये घेणार होते.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस