शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:24 IST

सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे.

Supriya Sule Vs Sunetra Pawar Baramati Loksabha ( Marathi News ) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात उभी फूट पडली आणि काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा निकालही निवडणूक आयोगाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पवारांकडून राजकीय अस्तित्वाची लढाई लढली जाणार आहे. त्यामुळे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कारण सुनेत्रा पवार यांनी केलेल्या सामाजिक कामांची माहिती देण्यासाठी बारामती शहरात आजपासून एक प्रचाराचा रथ फिरू लागला असून या रथातील एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांविषयी माहिती देण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर मागील निवडणुकीत पक्षाने जिंकलेल्या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण आपल्या पक्षाचा उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी याआधीच घोषित केलं होतं. त्यामुळे अजित पवारांकडून सुप्रिया सुळे यांना उघड आव्हान दिलं जाणार, हे स्पष्टच होतं. मात्र सुळे यांच्याविरोधात ते थेट आपल्या कुटुंबातील कोणाला रणांगणात उतरवतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकारणात पूर्वीच्या तुलनेत अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येत असून आज बारामती शहरात त्यांच्या प्रचारासाठी एक रथ फिरत असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

भाजप आमदाराची भेट अन् तब्बल तीन तास चर्चा!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून त्यांनी कालच बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल कुल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तासांच्या या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या गणितांबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडून लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार या खरंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कारण अजित पवार यांचे बारामती लोकसभा मतदासंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांचं प्रचंड नेटवर्क आहे. त्यांच्या जोडीला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकदही असणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :baramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस