शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:21 IST

Pune Metro Expansion: पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मेट्रोचे जाळे विणले जात असताना पुणेकरांसाठी महत्वाची बातमी येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुण्यातील मेट्रो लाईन २ च्या विस्तारासाठी 3,626 कोटींच्या निधीची मंजुरी दिली आहे. येत्या चार वर्षांत हा विस्तारित मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. पुण्यातील हा मार्ग सर्वात पहिल्यांदा सुरु करण्यात आला होता. परंतू, तो रामवाडी ते वनाझपर्यंतच होता. तो आता कोथरुडच्या दिशेने चांदणी चौक आणि रामवाडीच्या दिशेने विठ्ठलवाडीपर्यंत वाढविला जाणार आहे. 

या दोन्ही बाजुचा विस्तार हा एकूण १२.७५ किमी लांबीचा असणार आहे. या अंतरात १३ स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना जोडतील. 

या मेट्रो मार्गांचा फायदा आयटी प्रोफेशनल्ससोबतच  मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमधून येणाऱ्या बस प्रवाशांसाठी तसेच अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस प्रवाशांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत. पुण्यात अद्याप लाईन १, लाईन ३ चे काम सुरु आहे. पैकी लाईन १ वरील काही स्थानकांचे म्हणजेच खडकी, रेंजहिल या ठिकाणचे काम सुरु आहे. तर शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या मेट्रोचे काम बरेचसे बाकी आहे.  

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे