शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुण्यात विनोदी पोस्टरबाजी : भाजपला विरोध करायला गेले आणि त्यांचाच प्रचार करून आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 20:09 IST

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. पण या पोस्टरखाली भाजपचा सदस्य नोंदणी क्रमांक दिल्यामुळे ही उपरोधिक मोहीम पोस्टर लावणाऱ्यांवर उलटण्याची शक्यता आहे.  मात्र संपर्क क्रमांक तोच ठेवल्यामुळे भाजपची फुकट जाहिरात झाली आहे.  यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत. फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरात असे पोस्टर लावण्यात आल्याचे हळूहळू समोर येत आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर करून भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या दोनही पक्षांना मोठे भगदाड पडले असून येत्या काही दिवसात अजूनही काही आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी विरोधी पक्षांनी मात्र 'ज्यांना आमच्याकडे भ्रष्टाचारी म्हटले जाते त्यांना तिथे कसे घेतले जाते' असा प्रश्न निर्माण केला आहे. 

   या पोस्टरमध्ये ''ईडी व इन्कम टॅक्सची नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती, सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा' या अटींचा समावेश आहे. तसेच विचारधारेची कोणतीही अट नाही, आमच्याकडे जागा फुल झाल्यास मित्रपक्षात ऍडजेस्ट करण्यात येईल असेही यात लिहिले आहे.

 

पुण्यातील हडपसर भागात एका नगरसेवकाने लोकमतशी तब्बल १२ ठिकाणी हे पोस्टर लावले आहेत. याबाबत ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, 'हे पोस्टर कोणाच्या संकल्पनेतून आले माहिती नाही. पण सगळीकडे व्हायरल होत आहेत. भाजपच्या दुतोंडी भूमिकेला उत्तर म्ह्णून आम्ही हे पोस्टर लावले आहेत. एकेकाळी आमच्याकडे असलेले नेते भाजपला भ्रष्टाचारी दिसत होते. आता मात्र ते त्यांच्याकडे गेल्यावर ते जणू 'शुद्ध' झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सदस्य नोंदणी जाहिरातीला उत्तर म्हणून हे पोस्टर बनवले. त्या खाली भाजपच्या सदस्य नोंदणीचा क्रमांक देण्यात आला आहे'.

 या जाहिरातीत दिलेला संपर्क क्रमांक उत्सुकतेपोटी कोणाचा आहे म्हणून अनेकजण डायल करत आहेत. असे केल्यास मिस कॉलद्वारे थेट भाजपची सदस्य नोंदणी होत आहे. त्यामुळे हा प्रकार भाजपला टोला लागवण्यासाठी की त्यांचा प्रचार करण्यासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसHadapsarहडपसर