शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे कालव्याला मोठी गळती

By admin | Updated: February 14, 2015 00:09 IST

काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे.

डिंंभे : डिंभे धरणाच्या कालव्यातील गळतीमुळे दररोज हजारो-लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदिवासी भाग पाण्यासाठी वणवण करीत असताना धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. धबधबे वाहू लागले असून, सततच्या दलदलीमुळे जमिनीही नापीक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. ही गळती कधी थांबणार, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.धरणातून सध्या दुसरे आवर्तन सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दररोज ७५० क्युसेक्सच्या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डावा व उजवा कालवा हे या धरणाच्या दोन जलवाहिन्या आहेत. दर वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये या कालव्यांतून हजारो लिटर पाणी वाया जाते. धरणापासून निघालेल्या मुख्य कालव्याचे पुढे दोन भागांत रूपांतर होत असून, गावच्या पुढे जंपिंग कालवा तयार करण्यात आला आहे. सुमारे दोन कि.मी. निर्माण झालेल्या या कालव्यातून अनेक ठिकाणी गळती होत आहे. ही गळती कायम राहिल्यास भविष्यात या कालव्यास धोका निर्माण होऊ शकतो. कॅनॉलपासून निघालेला उजवा कालवाही अनेक ठिकाणी गळत असल्याने धरणाच्या खालच्या भागात डोंगरांना पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी ऐन उन्हाळयाच्या दिवसांत धबधबे वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जमिनीत दलदल निर्माण झाली आहे. उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.(वार्ताहर)