शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

भोर तालुक्यातील नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा; अपघाताचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:50 PM

भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिर्डोशी खोरे या खोऱ्यात जाण्याचा मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता. या रस्त्यावर नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा पडला आहे.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळेस किंवा गाडीला बाजू देताना होऊ शकतो अपघातपुलाचा खड्डा लवकरात लवकर भरून घ्यावा, नागरिकांची मागणी

महुडे : भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिर्डोशी खोरे या खोऱ्यात जाण्याचा मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता. या रस्त्यावर नांदगावजवळील पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्या वेळेस किंवा गाडीला बाजू देताना अपघात होऊ शकतो.हिर्डोशी खोऱ्यात जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता आहे. या रस्त्यावरून कोकणात जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. स्थानिक शेतकरी यांची बैलाची व जनावरांची वर्दळ असते. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम केले की मलमपट्टी करण्याचे काम केले, याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. नांदगाव येथील पुलावर अपघात झाल्यावर खड्डा बुजवला जाणार का, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.  जनतेचे सेवक म्हणणारे राजकीय नेते व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहावयास मिळत आहे. पुलाचा खड्डा लवकरात लवकर भरून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणे