जैविक हवाई इंधनासाठी भारताकडून मोठी अपेक्षा; मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:02 AM2024-01-21T08:02:36+5:302024-01-21T08:03:10+5:30

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांचे मत

Big Expectations from India for Biofuels; Opinion of Minister Hardeep Singh Puri | जैविक हवाई इंधनासाठी भारताकडून मोठी अपेक्षा; मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे मत

जैविक हवाई इंधनासाठी भारताकडून मोठी अपेक्षा; मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे मत

पुणे : जैविक हवाई इंधनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यासाठी आवश्यक तो कच्चा शेतमाल उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. जैविक हवाई इंधनासाठी जगभरातील बहुतेक देशांची भारताकडून मोठी अपेक्षा असल्याचे दावोस इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक व्यापार परिषदेत दिसून आले, असे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केले.

मद्यार्कापासून हवाई इंधन बनवणाऱ्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे उद्घाटन पुरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात एसएएफची निर्मिती होणार आहे. पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समूहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासह इंडियन ऑइल आणि अन्य तेल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

पुणे ते दिल्ली यशस्वी उड्डाण
ब्राझीलच्या आधी भारतात या जैविक हवाई इंधनाचा प्रकल्प उभा राहिल्याबद्दल पुरी यांनी प्राज उद्योग समूहातील तंत्रज्ञांचे अभिनंदन केले. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने जगासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मद्यार्कापासून बनवलेल्या हवाई इंधनाचा वापर करून गेल्या वर्षी पुणे ते दिल्ली हा विमान प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला होता. त्यावेळी दिल्ली विमानतळावर या विमानाचे स्वागत पुरी यांनीच केले होते.

Web Title: Big Expectations from India for Biofuels; Opinion of Minister Hardeep Singh Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.