बालेकिल्ल्यातील जागांसाठी मोठी गर्दी

By Admin | Updated: January 10, 2017 03:34 IST2017-01-10T03:34:01+5:302017-01-10T03:34:01+5:30

भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड, कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ ते २० साठी मुलाखती घेण्यात आल्या

Big crowd for cottage | बालेकिल्ल्यातील जागांसाठी मोठी गर्दी

बालेकिल्ल्यातील जागांसाठी मोठी गर्दी

पुणे : भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड, कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ ते २० साठी मुलाखती घेण्यात आल्या, या १० प्रभागांसाठी २६८ इच्छूकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने रात्री उशीरपर्यंत मुलाखती सुरू होत्या.
भाजपाच्या रामबाग, मयुर, डहाणुकर, हॅपी कॉलनी, एरंडवणा, शनिवार, कसबा, सदाशिव पेठ या बालेकिल्ल्यातील प्रभागांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या.
कसबा मतदारसंघातील प्रभागांचे इच्छुक मुलाखतीसाठी आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीच बहुतांश उमेदवारांची माहिती पॅनेलला दिली. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने वेगाने मुलाखती घेण्यात आल्या. राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस मुरली मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, गणेश घोष, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला
मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, अनुसुचित जाती मोर्चचे समन्वयक  डॉ. भरत वैरागे यांच्या पॅनेलने मुलाखती घेतल्या. मंगळवारी प्रभाग क्रमांक २१ ते ३० आणि बुधवारी ३१ ते ४१ प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Big crowd for cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.