शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 11:51 IST

खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस...

पुणे : महिलेला मोबाइलमध्ये ‘लोन ॲप’ डाऊनलोड करायला सांगितले. मात्र तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील नऊ जणांना अटक करण्यात आली. ‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी. मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते १० जून या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात घडला. या प्रकरणाचा तपास करून सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून ९ आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे व माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवित महिलेला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयाने या नऊ जणांना सात ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

‘लोन ॲप’चा वापर करून गुन्हा करणाऱ्या टोळीत आरोपींचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्याकडे हजारो जणांचा डेटा सापडला आहे. या सर्व लोकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची शक्यता आहे. या आरोपींना डेटा व तांत्रिक मदत करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी विविध व्हॉट्सॲप क्रमांकांवरून पीडितेला धमकावत विविध राज्यांतील बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना सीमकार्ड व बँक खाती कोणी पुरवली याची चौकशी करायची आहे. आरोपींनी उकळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करून खंडणीची रक्कम हस्तगत करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

बनावट कॉल सेंटरमधून खंडणीची मागणी

आरोपी बंगळुरूमध्ये बनावट कॉल सेंटर चालवत होते. ‘लोन ॲप’ डाऊनलोड करणाऱ्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रांसह माहितीचा आरोपी वापर करायचे. त्यानंतर पीडित व्यक्तींना बनावट व्हॉटस्ॲप व इतर मोबाइल क्रमांकाद्वारे धमकावायचे. पीडित व्यक्तींबद्दलचा बदनामीकारक संदेश त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविण्याची धमकी देऊन कर्जाची रक्कम व्याजासहित परत करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी करत होते, असे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीbangalore-central-pcबंगलोर सेंट्रलbankबँकcyber crimeसायबर क्राइम