शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपकडून बिडकर यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल; कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:55 IST

पुण्यात भाजपने १०० जणांची यादी जाहीर केली असून त्यापैकी ८० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने उपस्थित होते.  

पुण्यात भाजपने १०० जागा निश्चित केल्या असून एक यादी तयार केली आहे. आता त्याच यादीतील ८० उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यादी जाहीर न करता भाजपने थेट ८० जणांना एबी फॉर्म दिले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील अधिकृत भाजप उमेदवार म्हणून बिडकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्याबरोबरच प्रभाग २३ मधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तेही आज उमेदवारी दाखल करणार आहेत. 

कुणाल टिळक, स्वरदा बापट यांनाही उमेदवारी 

दिवंगत नेते गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्याबाबत भाजपने शब्द दिला होता. कुणाल टिळक यांना विधानसभेत उमदेवार मिळणार होती. मात्र त्यावेळी पुन्हा थांबवून त्यांना महापालिका निवडणुकीत संधी देऊ असा शब्द  देण्यात आला. तसेच गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनाही महापालिकेला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांना प्रभाग क्रमांक २५ मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे.  

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता या शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी जे इच्छुक अर्ज करतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. पण, मंगळवारी अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र मिळेलच याची खात्री नाही, असे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP fields Bidkar, Tilak, Bapat for Pune Municipal Elections

Web Summary : Ganesh Bidkar filed the first BJP nomination for Pune Municipal Corporation elections. Kunal Tilak and Swarada Bapat also received candidacy, fulfilling promises to their families. BJP has finalized 100 seats with 80 candidates receiving AB forms.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटीलgirish bapatगिरीश बापटMukta Tilakमुक्ता टिळक