सोशल मिडीयामुळे सापडली दुचाकी

By Admin | Updated: August 2, 2014 04:15 IST2014-08-02T04:15:16+5:302014-08-02T04:15:16+5:30

काही चांगले काही वाईट परिणामांची तुलना करता मोबाइलच्या व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो

The bicycle found by the social media | सोशल मिडीयामुळे सापडली दुचाकी

सोशल मिडीयामुळे सापडली दुचाकी

काळेवाडी : काही चांगले काही वाईट परिणामांची तुलना करता मोबाइलच्या व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो. याचा प्रत्यक्ष अनुभव काळेवाडीतील उत्तम लोंढे यांना आला.
येथील तापकीरनगरमधील लोंढे यांची हिरोहोंडा कंपनीची सीबीझेड दुचाकी (एमएच-१४ बीझेड ५२०१) मागील आठ दिवसांपूर्वी रहाटणी फाट्यावरील गवळी मार्केट येथील दुकानासमोरुन चोरीस गेली होती. गाडी चोरीस गेल्यानंतर त्यांनी याची खबर काळेवाडी पोलीस चौकीत देऊन त्या गाडीचा फोटो आपल्या मोबाइलवरील व्हॉटस्अ‍ॅप द्वारे सर्व मित्रांना पाठवून गाडी चोरीस गेल्याचे कळवले. तसेच चोरीस गेलेल्या गाडीचा तपास व्हावा या दृष्टीने वारंवार पोलीस चौकीत जाऊनही विचारणा केली. परंतु गाडीचा तपास लागत नव्हता. आठ दिवसांपासून ते हरवलेल्या गाडीचा शोध घेत होते. व्हॉट्सअ‍ॅपवर टाकलेल्या गाडीचा फोटो व नंबरमुळे त्यांना त्यांची गाडी एक आठवड्यानंतर वाकडमधील कस्पटे वस्तीजवळील एका हॉटेलजवळ पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो याचा प्रत्यय लोंढे यांना आला. तत्काळ त्यांनी याची खबर पोलिसांना देऊन आपली हरवलेली गाडी ते घरी घेऊन आले. (वार्ताहर)

Web Title: The bicycle found by the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.