शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:10 IST

राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती.

ठळक मुद्देयाप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पुणे : लॉकडाऊनच्या काळात पकडलेली बस सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी निलंबित केले आहे.मुरलीधर रामराव खोकले असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित यांनी बिबवेवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्य सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती. त्याने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या सांगण्यावरुन ही रक्कम घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीत खोकले यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी संचारबंदीमध्ये बिबवेवाडी पोलिसांनी बस पकडली होती़ त्यावेळी चारण हा राजपुरोहित यांना भेटला व खोकले यांच्या मदतीने बस सोडून देतो, असे सांगून १४ जुलै बसचालकाकडून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही बस न सोडल्याने त्यांनी विचारणा केल्यावर ३ दिवसांनी पैसे परत केले. संतोष गड्डा याने आरोपीची मुरलीधर खोकले यांच्याबरोबर ओळख करुन दिल्याचे तपासात आढळून आले होते. त्यात खोकले यांना सहआरोपी केल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे.

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीPoliceपोलिसsuspensionनिलंबनcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या