ओतूरजवळील रहाटी मळ्यात धुमाकूळ घालणारी बिबट मादी जेरबंद, वनविभागाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:43+5:302021-07-12T04:07:43+5:30
याने पिंजऱ्यातील बकरीचा फडशा पाडून पलायन केले होते. शनिवारी सकाळी याच पिंजऱ्यात पुन्हा बकरी हे भक्ष्य ठेवले होते. ...

ओतूरजवळील रहाटी मळ्यात धुमाकूळ घालणारी बिबट मादी जेरबंद, वनविभागाला यश
याने पिंजऱ्यातील बकरीचा फडशा पाडून पलायन केले होते. शनिवारी सकाळी याच पिंजऱ्यात पुन्हा बकरी हे भक्ष्य ठेवले होते. हा बिबट्या भक्ष्यासाठी पिंजऱ्यात घुसला व अखेर रात्री ९ च्या सुमारास जेरबंद झाला. तेथील स्थानिक शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय पानसरे यांनी तत्काळ वनविभागाला कळविले.
अगदी थोड्या वेळात ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, ओतूरचे वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक अतुल वाघोले, फुलवाडकर, वनमजुर फुलचंद हे घटनास्थळी हजर झाले.
परिसरात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती पसरली तेव्हा बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे या जेरबंद बिबट्याला जुन्नरजवळील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात तातडीने पाठविण्यात आले.
माणिकडोह येथे वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांनी या बिबट्याची तपासणी केली तेव्हा ही बिबट मादी आहे आणि सुमारे ३ ते ४ वर्षे वय असावे, असे सांगितले.
जेरबंद झालेली बिबट मादी