शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा येथील पावसाळी पर्यटकांचे खास आकर्षण असलेले 'भुशी धरण ओव्हरफ्लो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 17:54 IST

 मुंबई- पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांच्या मध्यावर असलेले लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देशनिवार व रविवारच्या मुहूर्तावर धरण भरले असले तरी पर्यटनाला बंदी

लोणावळा : येथील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज दुपारी ओव्हरफ्लो झाले. शनिवार व रविवारच्या मुहूर्तावर धरण भरले असले तरी पर्यटनाला बंदी असल्याने धरणावर आज चिटपाखरु देखील नव्हते.     मुंबई- पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांच्या मध्यावर असलेले लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. लाखो पर्यटक दरवर्षी येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने शनिवार रविवार असला तरी धरणावर निरव शांतता होती. धरण परिसरातील स्थानिक युवकांनी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती दिली. 

    लोणावळा शहरात कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. पोलीस प्रशासनाने सकाळपासून धरण परिसरात तसेच लायन्स पाँईट परिसरात पर्यटक जाणार नाहीत याकरिता चेकपोस्ट लावले आहेत. लोणावळा शहरात आज अखेरपर्यत 649 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरापेक्षा भुशी धरण व लायन्स पाँईट या डोंगरी भागात जास्त पाऊस झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले असले तरी पर्यटकांअभावी धरणाच्या पायर्‍या सुन्यासुन्या वाटत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाDamधरणRainपाऊसtourismपर्यटनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस