बारामतीच्या भूमिपूत्र डॉक्टरांची लंडनहून एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST2021-05-23T04:09:52+5:302021-05-23T04:09:52+5:30

बारामती शहरातील सुप्रसिद्ध डॉ. रवींद्र राजे यांचे चिरंजीव डॉ. गौतम राजे हे लंडननजीक सेवा करीत आहेत. बारामतीतील कोरोनाचे चित्र ...

Bhumiputra doctor from Baramati donates Rs 1 lakh from London | बारामतीच्या भूमिपूत्र डॉक्टरांची लंडनहून एक लाखाची मदत

बारामतीच्या भूमिपूत्र डॉक्टरांची लंडनहून एक लाखाची मदत

बारामती शहरातील सुप्रसिद्ध डॉ. रवींद्र राजे यांचे चिरंजीव डॉ. गौतम राजे हे लंडननजीक सेवा करीत आहेत. बारामतीतील कोरोनाचे चित्र पाहून त्यांनी तातडीने त्यांचे मित्र आनंद छाजेड यांच्या खात्यावर एक लाख रुपये पाठवून दिले. या पैशातून विविध बारामतीच्या विविध रुग्णालयांना आवश्यक असलेले १२ स्ट्रेचर्स खरेदी करण्यात आले आहेत.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्याकडे हे स्ट्रेचर्स सुपूर्त करण्यात आले. यावेळी किशोरकुमार छाजेड, आनंद छाजेड, अक्षय छाजेड, अलीअसगर बारामतीवाला,मेहुल दोशी, सम्यक छाजेड आदी उपस्थित होते.

तसेच, छाजेड परिवाराच्या वतीने डॉ. राजकुमार छाजेड यांच्या स्मरणार्थ किशोरकुमार छाजेड, सुरेश छाजेड, संतोष छाजेड यांनी १०० पीपीई किट डॉ. मनोज खोमणे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे सुपूर्त केले.

—————————————

डॉ. गौतम राजे यांच्या वतीने बारामतीच्या विविध रुग्णालयांना स्ट्रेचर देण्यात आले.

२२०५२०२१ बारामती—०४

Web Title: Bhumiputra doctor from Baramati donates Rs 1 lakh from London