भुयारी गटार कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:10 IST2021-04-10T04:10:37+5:302021-04-10T04:10:37+5:30

जेजुरी मोरगाव रस्त्याचे डांबरीकरण, तसेच सिमेंटीकरणचे काम झाल्याने रस्ता मोठा झाला आहे .मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे होणे गरजेचे ...

Bhumipujan of underground sewer work | भुयारी गटार कामाचे भूमिपूजन

भुयारी गटार कामाचे भूमिपूजन

जेजुरी मोरगाव रस्त्याचे डांबरीकरण, तसेच सिमेंटीकरणचे काम झाल्याने रस्ता मोठा झाला आहे .मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे होणे गरजेचे होते. तशी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मागणी होती . जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला . या भुयारी गटारांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोथान अनुदानातून सुमारे ९८ लाख निधी उपलब्ध झाला आहे .

या भुयारी गटाराचे भूमिपूजन नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या हस्ते झाले यावेळी नगरसेविका रुक्मिणी जगताप, अमिना पानसरे,नगरसेवक अतुल सावंत आदी उपस्थित होते .

०९ जेजुरी

जेजुरी मोरगाव रस्ता भुयारी गटर्सचे भूमिपूजन करताना पालिकेचे पदाधिकारी.

Web Title: Bhumipujan of underground sewer work