काळदरी ते किकवी रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:10 IST2021-05-24T04:10:48+5:302021-05-24T04:10:48+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेस फंडातून हे काम करण्यात येणार आहे. काळदरी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याचे जगताप ...

Bhumipujan of Kaladari to Kikvi road | काळदरी ते किकवी रस्त्याचे भूमिपूजन

काळदरी ते किकवी रस्त्याचे भूमिपूजन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेस फंडातून हे काम करण्यात येणार आहे. काळदरी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्याचे जगताप यांनी सांगितले.

खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप व पुरंदर तालुका सभापती नलिनी हरिभाऊ लोळे यांच्या प्रयत्नातून हुम्बे वस्ती ते पाचलिंग फाटा या दरम्यान ९०० मीटर बीबीएम व कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम मंजूर केले होते. त्या कामाला सुरुवात करण्यात आली काळदरी हा भाग अतिदुर्गम असल्याने या घाटा मार्फत संपूर्ण काळदरी खोऱ्याला कोल्हापूर- पुणे हायवेला दळणवळणासाठी खूप जवळचा मार्ग समजला जातो. दोन वर्षांपासून या घाटाची अवस्था खूप बिकट झाली होती. खूप मोठमोठे खड्डे या घाटात पडले होते आज भूमिपूजन करताना सरपंच गणेश जगताप यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर राज तनपुरे, प्रशांत शेंडकर, तुषार कारकर, ज्ञानेश्वर कोंढाळकर, अतुल थोपटे, तुळशीराम पेटकर, दत्ता पेटकर, अण्णा भगत, स्वागत कोंढाळकर, राजेंद्र कोकरे, अजिंक्य शेडगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ: काळदरी (ता. पुरंदर) ते किकवी रस्त्याचे भूमिपूजन करताना सरपंच गणेश जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of Kaladari to Kikvi road