वाघळवाडीत विकास कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST2020-12-11T04:28:52+5:302020-12-11T04:28:52+5:30
भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते ...

वाघळवाडीत विकास कामांचे भूमिपूजन
भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते.
यावेळी सैन्य दलात निवड झालेल्या ऊसतोड कुटुंबातील सचिन सापटे, युवराज ससे, कन्नडवस्ती मधिल विराम कांबळे या तिन्ही कष्टकरी कुटुंबातील युवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वेळी सरपंच नंदा सकुंडे,उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादिचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे, अनंत सकुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, पंचायत समिती सदस्या निता फरांदे, राष्ट्रवादिचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष विजय सावंत संचालक लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सावंत, सोसायटीचे चेअरमन संजय सावंत, सुचेता साळवे, सदस्य पांडूरंग भोसले, चेतन गायकवाड, सदस्या सुरेखा सावंत, लता शिंदे, श्रध्दा भुजबळ,ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर उपस्थित होते.
——————————————————
फोटोओळी : वाघळवाडी येथे विकास कामांचे भूमिपूजन करताना प्रमोद काकडे.
१०१२२०२०-बारामती-१५