शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळीकडे दुर्लक्ष करणे भोवले, १०५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविले

By राजू हिंगे | Updated: December 14, 2024 13:33 IST

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत

पुणे : शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी ९१ बांधकामांचे, तर दुसऱ्या दिवशी १४ बांधकामचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन दिवसांत १०५ बांधकाम प्रकल्पाचे काम थांबविले आहे.शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारदांनी उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले होते. त्यासाठीचे ई-मेल संबंधितांना करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करण्यास सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केली नाही अशा बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटिशीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६७ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४च्या अधिकारानुसार नोटीस मिळाल्यानंतर ताबडतोब बांधकामाचे काम बंद करण्यात यावे. बांधकाम चालू ठेवल्यास आम्हाला प्राप्त असलेल्या अधिकारान्वये काम करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे नमूद केले आहे. दुसऱ्या दिवशी कारवाई मंदावलीधुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्यादिवशी ९१ बांधकामांचे, तर दुसऱ्या दिवशी १४ बांधकामचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कारवाई मंदावली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpollutionप्रदूषण