भोर शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:02+5:302021-05-08T04:10:02+5:30

भोर शहरात व तालुक्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता यावर उपाययोजना करण्यासाठी भोर शहरात आजपासून १२ मेपर्यंत कडकडीत बंद ...

Bhor strictly closed in the city | भोर शहरात कडकडीत बंद

भोर शहरात कडकडीत बंद

Next

भोर शहरात व तालुक्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता यावर उपाययोजना करण्यासाठी भोर शहरात आजपासून १२ मेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शहरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे.

भोर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तसेच त्याठिकाणी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये ७ मे शुक्रवार पहाटे १ वाजल्यापासून १२ मे बुधवार रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सदर काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषधे दुकाने सुरू असतील. तर सकाळी ७ ते ९ या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहील. भाजीपाला, फळे, किराणासह सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत.

दरम्यान, पाच दिवसांचे लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा निर्देश दिले आहेत.

भोर शहरात कडकडीत बंद

Web Title: Bhor strictly closed in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.