‘भीमशंकर’च्या तोडणी यंत्राचे आयुक्तांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:29+5:302021-03-13T04:19:29+5:30
कारखान्यास गायकवाड यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी गायकवाड यांचे स्वागत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब ...

‘भीमशंकर’च्या तोडणी यंत्राचे आयुक्तांकडून कौतुक
कारखान्यास गायकवाड यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी गायकवाड यांचे स्वागत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, शांताराम हिंगे, ज्ञानेश्वर अस्वारे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, शिरीष सुर्वे, किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, राजेश वाकचौरे, शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे व अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या भीमाशंकर कारखान्याचे सुसज्ज प्रशासकीय कार्यालय, आर्थिक व्यवस्थापन व आर्थिक परिस्थिती, शेतकी विभाग, ऊस व्यवस्थापन, सुसज्ज प्रयोगशाळा आदी विभागाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी घेतली. ऊस उत्पादकता वाढ लक्ष हेक्टरी १३० टन या योजनेची सखोल माहिती घेऊन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम, माती व पाणी परीक्षण, ऊसबेणे वाटप, हिरवळीचे खते वाटप, ठिबक सिंचन अर्थसाहाय्य, ऊस रोपवाटिका, बायोकंपोष्ट पुरवठा, जिवाणू खते पुरवठा, सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवठा, जैव संजिवक पुरवठा, रासायनिक खते व औषधे पुरवठा, खोडवा व्यवस्थापन, एकत्मिक कीड नियंत्रण योजनेबद्दलही त्यांनी संचालक मंडळाचे कौतुक केले.
--
फोटो १२ भीमाशंकर कारखाना आयुक्त गायकवाड
फोटो ओळी : साखर आयुक्त