शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मावळातून ट्रेकला सुरुवात; भीमाशंकरला अर्ध्यावरच आयुष्य संपले, ट्रेकर्सचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:22 IST

भीमाशंकर कडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले

तळेघर :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणारे भीमाशंकर कडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे नीलख येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रमेश भगवान पाटील ( ५७) असे मृत झालेल्या ट्रेकर्सचे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथील राहणारे होते. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते. साळगावकर हे वकील व्यवसाय करतात. त्यांना गड आणि किल्ले फिरण्याचा छंद आहे. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजीत चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, सुनील गुरव व इतर तीन जणांनी मिळून पुणे ते भीमाशंकर असे २५ किलोमीटरचे पाई ट्रेकिंग आयोजित केले होते. रविवारी दि.१६ रोजी सकाळी पहाटे पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकर कडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले. यावेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची काही हालचाल होत नव्हती व श्वास बंद पडला होता. त्यांना तोंडाने ही कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न सर्वांनी केला.  परंतु काही फरक पडला नाही. 

त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला कॉल दिला. मात्रही तळेघर येथील १०८ रुग्णवाहीका दुसर्‍या काॅलवर असल्यामुळे त्यांच्या कडून लवकर  प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्वांनी उचलून रमेश पाटील यांना भीमाशंकर मंदिराजवळ आणले. श्री भीमाशंकर येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आले परंतु तो बंद असल्यामुळे घटनेची माहिती  घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ त्यांना निम्म्या रस्त्यामध्ये पोलिस वाहनातुन व नंतर १०८ रुग्णवाहिकेतुन तळेघर येथे प्राथमिक अरोग्य केंद्रामध्ये हलविण्यात आले. मात्र  व्यक्तीकडून कोणत्याही प्रसाद मिळत नसून त्यांना पुढे घोडेगाव येथे हलवा असे येथील डॉक्टरानी सांगितले. तेथून १०८ च्या रुग्णवाहिकेने घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता रमेश पाटील यांना मृत घोषित केले. सर्वांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.          रविवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व मुसळधार पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती परंतु घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलीस वाहनाचे सायरन वाजवत व आनंद सिंग करत पोलीस वाहन हे कसेबसे तळेघर पर्यंत पोहोचवले.१०८रुग्णवाहीकेचे डॉक्टर दादासाहेब गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न  करूनही त्यांना यश आले नाही.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTrekkingट्रेकिंगHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू