शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव : मिलिंद एकबोटेंसह 71 जणांवर तीन गावांत बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 11:23 IST

शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे : दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून दहा ते बारा लाखांचा जनसमुदाय येत असतो. 2018 मध्ये याठिकाणी हिंसा झाली होती. यंदा या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना न घडण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 71 जणांवर कोरेगाव भीमा, सणसवाडीसह वढु बुद्रुक या गावांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. 

   शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांनी ही माहिती दिली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून या परिसरात 71 जणांवर प्रतिबंधात्मक बंदीच्या नोटीसा काढल्या आहेत. यामध्ये मिलिंद एकबोटेंचेही नाव आहे. सोशल मीडिया वर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे अशावर कार्यवाही करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

1 जानेवारीला हा कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे या भागाची रोज पाहणी करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास ९८६०२७२१२३ व ०२१३७२८६३३३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे. 

 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या ठिकाणी  येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या वतीने आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्यात येतील, असे सांगून जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायम स्वरुपी पथदिवे बसविण्याचे काम लवकरच पुर्ण होईल. याबरोबरच मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMilind Ekboteमिलिंद एकबोटेPuneपुणे