शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

भावगीत ही धनदौलत

By admin | Updated: June 13, 2017 04:27 IST

भारावून टाकणे म्हणजे काय प्रकार असतो ते गजाननरावांमुळे अनुभवायला मिळाले. गजाननरावांचे गाणे पहिल्यांदा ऐकायला मिळाले ते माझ्या भावे हायस्कूलच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारावून टाकणे म्हणजे काय प्रकार असतो ते गजाननरावांमुळे अनुभवायला मिळाले. गजाननरावांचे गाणे पहिल्यांदा ऐकायला मिळाले ते माझ्या भावे हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात. शाळेत त्यांना शंभर रुपये मानधन दिले होते. मला वाटले होते, की दहा-पंधरा रुपये देतील. पुणेकर एका व्यक्तीला एवढे मानधन देतील, हा माझ्यासाठी धक्का होता. गजाननरावांनी दिलेला तो पहिला धक्का. त्यांचे गाणे ऐकणे हा काही वेगळाच आनंद होता. तो शब्दांत सांगता येत नाही, अशी भावना व्यक्त करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गजाननराव वाटवे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी भावगीताचे युगनिर्माते काव्यगायक गजाननराव वाटवे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते गजाननराव वाटवे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त अरुण नूलकर व कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘गजाननराव, सुधीर फडके, पु. ल., गदिमा, शांता शेळके यांची प्रतिभा खूप अलौकिक होती. अलीकडच्या पिढीला किरकोळ गाणी ऐकण्याची सवय झाली आहे. चांगली गाणी काय असतात ते या प्रतिभावंताकडे पाहिले, की कळते. भाव काळजापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य भावगीतांमध्ये आहे. भावगीते ही धनदौलत आहे.’’ ‘निरांजनातील वात’ हा वाटवे यांच्या रचनांचा कार्यक्रम प्रमोद रानडे, अपर्णा संत, कविता जांभेकर यांनी सादर केला.वाटवेंच्या चाली अभ्यासाचा विषयसत्काराला उत्तर देताना श्रीधर फडके म्हणाले, ‘‘गीतकार, संगीतकार गजाननराव वाटवेंनी माझे भावविश्व समृद्ध केले. असंख्य गोड गाणी आणि चाली त्यांनी दिल्या. त्यांच्या चाली हा अभ्यासाचा विषय आहे. शब्दांना नेमके स्वर कसे येतात, हा नेहमी संशोधनाचा विषय आहे. काळाच्या पुढच्या चाली त्यांनी दिल्या. माझ्यावर बाबुजींसह मागच्या पिढीतील सर्व कलाकारांचे संस्कार आहेत.’’