शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Bharti Pawar: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:31 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही.

ठळक मुद्देदेशातील लसीकरण मोहिमेत लवकरच १०० कोटी जणांच्या लसीकरणाचा आकडा पार होणार

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी सुरक्षितेतच्या चाचण्या सध्या सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

पुणे महापालिकेने कोरोना आपत्तीच्या काळात केलल्या उपाययोजनांसह लसीकरण मोहिमेच्या कामाचा आढावा डॉ. पवार यांनी घेतला़, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते.      पवार म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र देशात असले तरी महाराष्ट्र व केरळ राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आजही मोठी आहे.  त्यामुळे केंद्र सरकारने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लादण्याबाबतचे आदेश त्या-त्या राज्यांना दिले आहेत. इतर देशांमध्ये कोरोना तिसरी-चौथी लाट आलेली आहे. अशा वेळी सर्वांना लसीचे दोन डोस पूर्ण करणे हे महत्वाचे काम आपण करत आहोत. देशातील अनेक राज्यांमध्ये काही ठिकाणी ९० टक्के तर काही राज्यांमध्ये ७० टक्क्यांच्या पुढे लसीकरण झाले आहे. संपूर्ण देशातील लसीकरण मोहिमेत लवकरच १०० कोटी जणांच्या लसीकरणाचा आकडा पार होर्ईल. मात्र ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना बुस्टर डोस देण्याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.  

शास्त्रीय अभ्यासावर बोलणे उचित 

''राज्यात लसीचा एक डोस घेतलेल्यांना विविध ठिकाणच्या प्रवेशाबाबत मान्यता देण्यात येईल याबाबत नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.यावर बोलताना डॉ भारती यांनी, राजकीय भूमिकेपेक्षा एखादा निर्णय घेताना शास्त्रीय अभ्यास महत्वाचा असतो असे सांगितले. दरम्यान मंदिरे खुली करण्याबाबतची मागणी ही मंदिरांवर अवलंबून असलेल्या अनेकांच्या रोजगारासाठी करण्यात आली होती असेही त्या म्हणाल्या.''

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यRajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार